ग्रामपंचायत सदस्य हे आपल्या वॉर्डमधील नागरिकांचे प्रतिनिधीत्व करतात. त्यांच्या कर्तव्यांमध्ये समस्या निवारण, योजना अंमलबजावणी, नागरिकांशी संपर्क, व विकास कामात सहभाग यांचा समावेश आहे.
आपल्या वॉर्डमधील पाणी, रस्ता, स्वच्छता यासारख्या समस्या वेळेत प्रशासनाकडे पोहोचवून त्यांची सोडवणूक सुनिश्चित करणे.
वॉर्डच्या नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या गरजा समजून घेणे व शासकीय योजना त्यापर्यंत पोहोचविणे.
गावातील शासकीय योजना लाभार्थ्यांची निवड योग्य पद्धतीने करणे आणि त्यांच्या अंमलबजावणीत योगदान देणे.
गावातील सार्वजनिक सुविधा, स्वच्छता व इतर विकास कामांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन त्यांची गुणवत्ता सुनिश्चित करणे.
सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवकांसह समन्वय साधून गावाच्या सर्वसाधारण हितासाठी काम करणे.